वाकडमधील सब-वेच्या कामाचे नगरसेवक संदिप कस्पटे यांनी अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी

0
477

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वाकड येथील पार्कस्ट्रिटजवळ सुरू असलेल्या सब-वे व रस्त्याच्या कामाची भाजप नगरसेवक संदिप कस्पटे यांनी अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी (दि. २५) पाहणी केली. हे काम एक महिन्यात पूर्ण करून रस्ता आणि सब-वे नागरिकांसाठी खुला करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

वाकड येथील पार्कस्ट्रिटजवळ सब-वे आणि रस्त्याचे काम सुरू आहे. नगरसेवक संदिप कस्पटे यांनी महापालिकेच्या बीआरटी विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांच्यासोबत या कामाची पाहणी केली. हे काम संथ गतीने सुरू असल्याबाबत नगरसेवक कस्पटे यांनी नाराजी व्यक्त केली. नागरिकांना या सब-वे चा आणि रस्त्याचा लवकरात लवकर वापर करता यावा यासाठी कामाचा वेग वाढवण्यास त्यांनी सांगितले.

या कामाला विजेच्या खांबाचा अडथळा ठरत आहे. त्यामुळे स्थापत्य विभागाने विद्युत विभागाशी समन्वय साधून येत्या एक महिन्यात काम पूर्ण करून तेथील मार्ग जनसामान्यांना खुला करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार कामाला वेग देण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांनी दिले.