वडिलांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी तिला फक्त तीन मिनिटे…

0
321

मनिपूर, दि. ५ (पीसीबी) – कोरोनामुळे अनेक कुटुंबांवर संकट कोसळले. अनेकदा जवळच्या नातेवाईकांना साधे अत्यंदर्शनही दुर्लभ होते. असाच एक अनुभव २२ वर्षाच्या मुलीला आला. कोरोना संशयित असलेल्या मुलीला इम्फाळ येथील क्वारटाइन सेंटरमध्ये ठेवले होते. याचवेळी दीर्घ आजाराने तिच्या वडिलांचे निधन झाले. यावेळी मनिपूर येथील तिच्या घरी तिला आणले, पण वडिलांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी तिला फक्त तीन मिनिटे देण्यात आली होती.

तरुणी आपल्या वडिलांचं अंत्यदर्शन घेत असल्याचा ह्रदयद्रावक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. वडिलांच्या मृतदेहाजवळ जाऊन त्यांना निरोप देत असताना तिची आई, नातेवाईक किंवा शेजारी कोणालाही तिच्या जवळच जाण्याची परवानगी नव्हती. मुलगी समोर धाय मोकलून रडत असताना तिच्या आईकडे मात्र पाहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. यावेळी डॉक्टरांचं सर्व लक्ष मात्र घड्याळाकडे होतं. तीन मिनिटं पूर्ण होताच डॉक्टरांनी तरुणीला तेथून हलवलं.
२५ मे रोजी तरुणी चेन्नई येथून श्रमिक ट्रेनने आपल्या घरी परतली होती. ट्रेनमधील एक प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळल्याने तरुणाला संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आलं होतं. प्रशासनाकडून रितसर परवानगी घेतल्यानंतर आणि पीपीई किट परिधान केल्यानंतरच तरुणीला वडिलांचं अंत्यदर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली.