वडमुखवाडीत रविवारी ‘गायत्री महायज्ञा’चे आयोजन

0
734

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – श्री गायत्री संशोधन सेवा मंडळाच्या वतीने वडमुखवाडी, आळंदी रोड, येथील गायत्री मंदिरात २० जानेवारीरोजी ‘गायत्री महायज्ञ’चे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी पहाटे ४ वाजता महाअभिषेक, सकाळी ७ वाजता महायज्ञ, सकाळी १० वाजता वार्षिक अहवाल वाचन आणि पुढील योजनेबाबत चर्चा, सकाळी ११ वाजता आध्यात्मिक व्याख्यान, दुपारी १२ वाजता महाआरती, तर त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी उपासक नंदकुमार देशमुख (मोबाईल- ९८२३०१४९६३) यांच्याशी संपर्क साधावा.