लोकसभा निवडणूक, उद्या घोषणा होणार

0
111

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – निवडणूक आयोग शनिवारी दुपारी ३ वाजता लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या तारखा जाहीर करेल. यासोबतच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते थेट प्रक्षेपित केले जाईल. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात सुरू असलेली बैठक संपली आहे. ही बैठक सुमारे ४५ मिनिटे चालली. नवनियुक्त आयुक्तांचे औपचारिक स्वागत झाल्यानंतर पूर्ण आयोगाच्या बैठकीला सुरुवात झाली.

गेल्या वेळी सात टप्प्यांत झाल्या होत्या निवडणुका
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुका सात टप्प्यात पार पडल्या. गेल्या वेळी निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी तारखा जाहीर केल्या होत्या. पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिलला तर शेवटच्या टप्प्यासाठी १९ मे रोजी मतदान झाले. 23 मे रोजी निकाल लागला. त्या निवडणुकीच्या वेळी देशात ९१ कोटींहून अधिक मतदार होते, त्यापैकी ६७ टक्के मतदारांनी मतदान केले होते.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २०१४ च्या तुलनेत मोठा विजय मिळवला होता. २०१४ मध्ये भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या, तर २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएला ३५३ जागा मिळाल्या होत्या. भाजपला ३७.७% पेक्षा जास्त मते मिळाली होती, तर NDA ला ४५% मते मिळाली होती. काँग्रेसला केवळ ५२ जागा जिंकता आल्या.