लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली

0
355

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – सार्वत्रिक लोकसभा  निवडणुकीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय  निवडणूक आयोगाने १० मार्चपासून देशभरात  आचारसंहिता लागू केली होती. लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरूवारी (दि.२३ मे) जाहीर झाला. त्यामुळे  आजपासून (सोमवार)  आचारसंहिता संपत आहे, असे निवडणूक आयोगाने  सर्व राज्यांना पत्राद्वारे कळवले आहे

याबाबतचे पत्र सर्व राज्यांच्या मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठवण्यात आले आहे. १० मार्च रोजी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली होती. देशभरात सात टप्प्यात मतदान पार पडले. २३ मेरोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाली.

१० मार्चपासून लोकसभा  निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली होती.  सोमवारपासून  आचारसंहिता मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून दैनंदिन प्रशासकीय आणि विकास कामांना  सुरूवात करता येणार आहे. त्यामुळे आचारसंहितेमुळे  रखडलेल्या कामांना  वेग येणार आहे.