लॉकडाऊन आणखीन एक महिन्याने वाढवा मुख्यमंत्र्यांनी केली मागणी

0
378

प्रतिनिधी (पीसीबी) : कोरोना वायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत वीडियो कॉन्फ्रेंसद्वारे संवाद साधला. या बैठकीत उपस्थित असलेल्या काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा कालावधी आणखीन एक महिन्याने वाढवण्याची मागणी केली. 

लाॅकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास फायदा होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्च्युअल बैठकीत सांगितले. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक व आरोग्य राज्यमंत्री नबा दास यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन ३ मे नंतर किमान एक महिन्याने वाढविण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली. गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी देखील एक महिन्यासाठी लाॅकडाऊन वाढवण्यासाठी दुजोरा दिला व ग्रीन झोन क्षेत्रात काही प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरु करण्याची मागणी केली, तर अन्य काही मुख्यमंत्र्यांनी लेखी सुचना केल्या.
२५ मार्चपासून देशात लाॅकडाऊन लागू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चौथ्यांदा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. आजच्या बैठकीत गृह मंत्री अमित शाह व केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन देखील उपस्थित होते. लाॅकडाऊन बाबत पंतप्रधान काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.