लॉकडाउनमध्ये वेगवेगळ्या भागात घरफोडीच्या घटना;  १ लाख ६७ हजारांचा ऐवज लंपास करून चोरट्यांचा पोबारा

0
301

पुणे, दि. २ (पीसीबी) – लॉकडाउनच्या कालावधीत शहरातील दोन वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी सदनिकेतून १ लाख ६७ हजारांचा ऐवज लांबविल्याच्या घटना समोर आल्या आहेत. भारती विद्याापीठ आणि कोंढवा भागात या घटना घडल्या.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारती विद्याापीठ परिसरातील शिवराज पार्क सोसायटीतील रहिवासी वेणूगोपाल कैरमड्डोडा (वय ३३) यांची सदनिका गेल्या महिन्याभरापासून बंद आहे. याच संधीचा फायदा घेत चोरटयांनी कैरमकोड्डा यांच्या सदनिकेचे कुलुप बनावट चावीने उघडून कपाटातील ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आल्यानंतर त्यांनी भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक भूषण कोते तपास करत आहेत. तसेच कोंढवा भागातील वडाची वाडी परिसरात असलेल्या प्लॅटीनम पार्क सोसायटीतील सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची साधून चोरट्यांनी कपाटातील ८२ हजारांची रोकड लांबविली. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक निलेश चव्हाण तपास करत आहेत.