लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आरोपीची ओळख जाहीर करु नये; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

0
385

दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आरोपीची ओळख जाहीर केली जाऊ नये अशी मागणी करणारी एक याचिका यूथ बार असोसिएशन ऑफ इंडियाने या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. माध्यमांनी देखील संपूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीची ओळख जाहीर करू नये, असे निर्देश मीडियाला द्यावेत, अशीही मागणी या याचिकेत आहे.

अनेकदा खोट्या आरोपांमुळे एखाद्या निर्दोष व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य उद्धवस्त होते. आरोपीला लैंगिक शोषणाच्या प्रकरणात गोवण्यात आले आणि नंतर याचा त्रास सहन न होऊन त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणे आहेत, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. खोट्या आरोपांमुळे केवळ त्या व्यक्तीलाच नाही तर त्याच्या कुटुंबीयांनादेखील सामाजिक धक्का बसतो. यामुळे लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आरोपीची ओळख जाहीर केली जाऊ नये अशी मागणी केली आहे.