‘लागा रे तयारीला’; राज ठाकरेंच्या विधानसभा लढविण्याच्या सुचना  

0
921

नाशिक, दि. २७ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणूक मनसे लढवणार की नाही, असा संभ्रम आता दूर झाला आहे. कारण पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक तयारीला लागण्याच्या सुचना दिल्याचे मनसेचे प्रदेश सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी  सांगितले.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना मनसेच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा संदेश राज ठाकरे यांनी दिला असल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले.  मनसे विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी कधीच म्हटले नाही,  असेही देशपांडे यांनी  यावेळी स्पष्ट केले.

राज्यातील २८८ मतदारसंघांत विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु किती जागा लढवायच्या, याबाबतचा अंतिम निर्णय  पक्षाध्यक्षच घेणार  आहेत. दरम्यान, आता मनसे आघाडीसोबत जाणार की ? स्वतंत्र निवडणूक लढवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.