लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

0
415

ताथवडे, दि. २१ (पीसीबी) – कार्गो व्यवहार करत 72 लाखांच्या मालाचा अपहार केला. तसेच 32 लाख रुपयांची आणखी मागणी केली. याप्रकरणी संबंधित कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मागील एक वर्षापासून 20 जानेवारी 2020 पर्यंत ताथवडे आणि इतर ठिकाणी घडली आहे.

डिलेव्हरी लिमिटेडचे संपूर्ण मॅनेजमेंट व्हाईस प्रेसिडेंट हरीश शर्मा, फायनान्स ऑफिसर नीरज पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रथम संजीव चौधरी (वय 21, रा. बाणेर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची जस्टलाॅग सोल्युशन एल एल पी नावाची कंपनी आहे. फिर्यादी यांच्या कंपनीचा कार्गो व्यवहार करण्यासाठी त्यांनी हरीश शर्मा यांच्याशी बोलणी केली. त्याबाबत व्यवहार करून फिर्यादी यांनी 72 लाख रुपयांचा माल आरोपींच्या ताब्यात दिला. तो माल ठरवलेल्या ठिकाणी पोहोच न करता आरोपींनी त्याचा अपहार केला. तसेच फिर्यादी यांच्या वडिलांकडे आणखी 32 लाख रुपये रक्कम बाकी असल्याचे सांगत पैसे नाही दिले तर माल विसरून जा, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लोहार तपास करीत आहेत.