लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यू दंड –  केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

0
734

दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार असल्याचा निर्णय आज (शुक्रवार) केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. आता पॉस्को कायद्यात बदल करण्यात आला असून त्याअंतर्गत ही शिक्षा दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली.

बारा वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकार कायद्यात बदल करेल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी दिले आहे. यासाठी लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पोस्को) बदल केला जाईल, असे मनेका गांधी म्हटल्या होत्या. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने आज अखेर पॉस्को कायद्यात बदल केले असून यापुढे लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे.