लढाई संपलेली आहे, तुमचे कर्म तुमची वाट पाहतेय; राहुल गांधींचा मोदींवर पलटवार

0
469

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – मोदी जी, लढाई संपलेली आहे. तुमचे कर्म तुमची वाट पाहतेय. तुमची तुमच्याबद्दलची वैयक्तिक मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुमची सुटका होणार नाही, अशा शब्दांत  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर तोफ डागली आहे.

मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर  राहुल गांधी यांनी आज (रविवार) ट्विटरवरून पलटवार केला आहे.

दरम्यान, मोदींनी  प्रतापगड आणि बस्ती येथील जाहीरसभांमध्ये राहुल यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केली होती.  तुमच्या वडिलांची प्रतिमा तुमच्या ‘राजदरबाऱ्यांनी’ मिस्टर क्लीन अशी रंगवली होती. पण त्यांच्या आयुष्याची अखेर ‘भ्रष्टाचारी नंबर १’ च्या रुपात झाली. नामदार  हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुका माफ करतो, पण फसवेगिरी कधीही माफ करत नाही, असे मोदी म्हणाले होते.