‘लग्नाला बोहल्यावर उभे राहण्याआधीच नवरा पळाला, – गिरीष बापट

0
414

पुणे, दि.४ (पीसीबी) – मी स्वत: कोणतीही बातमी ऐकली नाही. मी ऐकीव बातम्यांवर प्रतिक्रिया देत नाही. परंतु असे घडू शकते हे नाकारता येत नाही. लग्नाला बोहल्यावर उभे राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती उद्भवली आहे, असे म्हणत खासदार गिरीष बापट यांनी भाजपाला चिमटा काढला. अब्दुल सत्तार यांनी आज (शनिवार) आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीला लागलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, अशातच त्यांचा राजीनामा महाविकास आघाडीसाठी मोठा धोका मानला जात आहे.

मी अशी बातमी ऐकली नाही. सरकारने अद्यापही खातेवाटप केले नाही. सत्तार यांनी का राजीनामा दिला हे माहित नाही. लग्नाला बोहल्यावर उभे राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती उद्भवली आहे. तीन पायांच्या सरकारमध्ये काहीही होऊ शकते. सरकारमध्ये काय चलबिचल सुरू आहे हे यातून दिसून येते, असे बापट यावेळी म्हणाले. मंत्रिपदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणे हा संदेश आजवर सरकारच्या माध्यमातून गेला आहे. परंतु भविष्यात काय होईल याची चुणूक यातून दिसते.तीन पक्षांचे सरकार आपल्या तत्त्वांशी तडजोड करून सत्तेवर आले आहे, असेही त्यांनी नमूद केले.