लग्नात मानपान दिला नाही, म्हणून ‘अशा’ अमानुष पद्धतीने तिला त्रास देण्याचा प्रयत्न

0
451

पिंपरी,दि. १ (पीसीबी) – लग्नामध्ये मानपान केला नाही. तसेच विवाहितेने माहेरहून पैसे, सोन्याचे दागिने आणले नाहीत. या कारणावरून पती, सासू, सासरे आणि नणंदेने विवाहितेचा छळ केला. तसेच नणंदेने विवाहितेला इलेकट्रोनिक शेगडीवर ढकलण्याचा प्रयत्न केला. ही घटना 4 जुलै 2019 ते 16 नोव्हेंबर 2020 या कालावधीत घडली.

पती समीर श्रीकांत ढाकरे, सासू निर्मलाबाई श्रीकांत ढाकरे, सासरे श्रीकांत ढाकरे, नणंद स्नेहा श्रीकांत ढाकरे (सर्व रा. औरंगाबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 29 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती समीर, सासू निर्मलाबाई, सासरे श्रीकांत आणि नणंद स्नेहा यांनी फिर्यादी विवाहितेच्या लग्नात तिच्या माहेरच्या लोकांनी मानपान केला नाही. तसेच विवाहितेने माहेरहून पैसे आणि सोन्याचे दागिने आणले नाहीत या कारणावरून विवाहितेला टोमणे मारून शिवीगाळ केली. नणंद स्नेहा हिने विवाहितेला इलेकट्रोनिक शेगडीवर ढकलण्याचा प्रयत्न करून हाताने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.