लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार

0
670

पुणे, दि.२५ (पीसीबी) – विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून  औरंगाबाद वरून नगरला पळून आणून तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी लॅाजवर घेऊन जात तिच्यावर शारिरीक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी योगेश सिध्देश्वर शिंदे (रा.घारगाव.ता श्रीगोंदा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साल २०१७ ते २० जुलै २०१९ दरम्यान विविध भागात घेऊन जात तिच्यासोबत शारिरीक सबंध ठेवले योगेश शिंदे याने पीडित महिलेला लग्नाचे लग्नाचे आमिष  दाखवून तिच्या पतीपासून तिला पळवून आणले.नगरमध्ये तारकपूर आणि वाळुंज एमआयडीसी येथे तिला भाड्याने रुम घेऊन दिला. या खोलीत पण तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

याप्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या माहितीनुसार योगेश शिंदे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.