रोड शोदरम्यान सनी देओल यांना महिलेने केले किस, व्हायरल होत आहे व्हिडिओ…

0
463

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) –अभिनेता सनी देओल यांना भाजपने पंजाबमधील गुरुदासपूर येथून लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे. निवडणुकीचे तिकीट जाहीर होताच, त्यांनी आपल्या मतदारसंघात रोड शो करण्यास सुरुवात केली. गुरुवारी दिल्लीतील बाटला येथे एका रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या एका महिला चाहतीने चक्क सनी देओल यांच्या गाडीवर चढून त्यांना किस केला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.