रॉबर्ट वाड्रा रूग्णालयात दाखल

0
419

नवी दिल्ली , दि. २२ (पीसीबी) –  पाठीत अचानक दुखायला लागल्यामुळे  काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी  यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना नोएडा येथील मेट्रो रूग्णालयात सोमवारी (दि.२१)  दाखल करण्यात आले आहे.   रूग्णालयाने वाड्रा य़ांच्या प्रकृतीविषयी अद्याप कोणतीही माहिती  दिलेली नाही.

रॉबर्ट वाड्रा यांच्यासह प्रियंका वाड्रा देखील रूग्णालयात उपस्थित आहेत. वाड्रा यांना रूग्णालयात दाखल केल्यामुळे एसपीजीने मेट्रो रूग्णालयाला घेरले आहे. तर काही काँग्रेस नेतेही रूग्णालयात दाखल झाले आहेत.

त्याचप्रमाणे, प्रियंका गांधी-वाड्रा आज दोन दिवसांच्या रायबरेलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याठिकाणी पक्ष मजबुतीकरणासाठी कार्यकर्त्यांशी त्या चर्चा करणार आहेत. काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेतही त्या हजेरी लावणार आहेत.