रिया चक्रावर्ती ला अटक होणार ?

0
482

मुंबई, दि. २७ (पीसीबी) : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने त्याची गर्लफ्रेंड- अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केले आहे. रियाचा भाऊ शोविक, आई आणि वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांचीही आज चौकशी होणार आहे. तर सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी यालाही सलग दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलावले आहे.

रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती सकाळी दहा वाजताच्या सुमारास कागदपत्रे घेऊन सांताक्रूझमधील डीआरडीओ गेस्ट हाऊसला आला. आज दिवसभरात रिया चक्रवर्तीच्या कुटुंबाची विविध तपास यंत्रणांकडून चौकशी होण्याची शक्यता बळावली आहे. तर बक्कळ पुरावे असल्याने रियाला सीबीआय अटक करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांना पुन्हा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे.

रियाचे वडील ईडी कार्यालयाकडे रवाना
रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रियाच्या वडिलांना आज सकाळीच ईडीने समन्स बजावले होते. त्यानंतर ईडी कार्यालयात घेऊन जाण्यासाठी पोलीस रियाच्या घरी दाखल झाले
मुंबई पोलीस दलातील एक हवालदार रिया चक्रवर्तीच्या इमारतीत दाखल झाला आहे.

केअरटेकर दीपेश सावंत माफीचा साक्षीदार होणार?
सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गूढ लवकर उलगडण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. सुशांतचा नोकर आणि केअरटेकर दीपेश सावंतने रिया आणि सुशांतच्या वादाचे तपशील दिले. दीपेश सध्या डीआरडीओ गेस्टहाऊसमध्ये
मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) टीमलाही मुंबईतील अमली पदार्थ विक्रेत्यांनाच्या नेटवर्कचा तपास सुरु करण्यास सांगितले आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग नेटवर्क तपासण्यास सांगितले आहे.

दरम्यान, रिया चक्रवर्ती दीर्घ काळापासून माझा मुलगा सुशांतला विष देत होती, तीच त्याची मारेकरी आहे. तपास यंत्रणेने तिला आणि तिच्या साथीदारांना अटक केलीच पाहिजे, अशी मागणी सुशांतसिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी केली.