रा.स्व.संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरात उद्या २५ स्थानी पथसंचलन

0
154

पिंपरी चिंचवड दि.२३ (पीसीबी) – राष्ट्रहित व सेवा कार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी निमित्याने शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी उद्या विजयादशमी निमित्त मंगळवार दि.२४ ऑक्टोबर विजयादशमी रोजी पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल २५ स्थानाहून विविध भागातील नियोजित मार्गावर संघ गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन निघणार आहे. घोषाच्या तालावर हे संचलन होणार असून संघ स्वयंसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रमुख अतिथी विविध भागातील संचलनात सहभागी होतील. जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे.

विविध भागातील पथसंचलन स्थान व वेळ –

नगर : देहू
वेळ : सायं.४.३० वाजता
स्थान : डिवाईन नेस्ट समोरील मैदान, परंडवाल चौक, माळवाडी, देहू

नगर : देहूरोड
वेळ : सायं. ०४:३० वाजता
स्थान : लायन्स क्लब शाळेसमोरील मैदान, मामुर्डी

नगर : निगडी
वेळ : सकाळी ०७:३०
स्थान : स्वामी विवेकानंद शाळेजवळ काळभोर नगर

नगर : संभाजी नगर
वेळ : सकाळी ०७:३०
स्थान : शेषाबाई गणगे प्रशाला कृष्णा नगर

नगर : चिखली
वेळ : सकाळी ०७:३०
स्थान : नागेश्वर विद्यालय क्रीडांगण पाटील नगर, चिखली

नगर : दिघी
वेळ – सायं ५ वाजता
स्थान : गेलेक्सी शाळा, स्वराज कॉलनी, श्री गजानन महाराज नगर भोसरी आळंदी रोड, दिघी

नगर : मोशी
वेळ : सकाळी ०७:३०
स्थान : सिल्व्हर गार्डनिया, बोराडेवाडी, मोशी

नगर : आळंदी
वेळ : सकाळी ०७:२५ वाजता
स्थान : बन्सी बाबा करवा धर्म शाळेजवळ हनुमानवाडी, केळगाव

नगर : चऱ्होली
वेळ : सायं ४.०० वाजता
स्थान : फोरे स्टिया सोसायटी समोर पुणेरी स्वीट मागे, डुडूळगाव

नगर : भोसरी
वेळ : संध्याकाळी ०७:००
स्थान : विरंगुळा केंद्र, दिघी रोड भोसरी

नगर : इंद्रायणी नगर
वेळ : सायं. ०४:०० वाजता
स्थान : त्रिवृक्ष संगम दत्त मंदिराजवळील मैदान, जलवायू विहार जवळ, सेक्टर ६, इंद्रायणी नगर

नगर : संत तुकाराम नगर
वेळ : सकाळी ०७:३०
स्थान : सम्राट विक्रमादित्य उद्यान रेणुका गुलमोहर फेज १ समोर मोरवाडी

नगर : कासारवाडी
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : गणेश मंदिर, दापोडी

नगर : सांगवी
वेळ : सकाळी ०८:००
स्थान : पि डब्लू डी मैदान साई चौक नवी सांगावी.

नगर : पिंपळे गुरव
वेळ : सकाळी ०७:३०
स्थान : ८ते ८० उद्यान सुदर्शन चौक , सुदर्शन नगर

नगर : पिंपळे सौदागर
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : कोकणे चौक

नगर : पिंपळे निलख
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : म्हातोबा मंदीर चौक पिंपळे निलख

नगर : काळेवाडी
वेळ : सकाळी ०६:४
स्थान : काका इंटरनेशनल स्कूल समोरील मैदान रहाटनी

नगर : पिंपरी
वेळ : सकाळी ०७:३०
स्थान : महात्मा ज्योतिबा फुले उद्यान पवणेश्वर मंदिरा जवळ पिंपरी गाव

नगर : चिंचवड पूर्व
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : ऑक्सीजन पार्क जवळ लक्ष्मी नगर चिंचवड

नगर : चिंचवड पश्चिम
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : बॉडबिंटन हॉल रस्ता पवना नगर चिंचवड

नगर : वाकड/ थेरगाव
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : एक्सीबिशन मैदान दत्त मंदीर रोड वाकड

नगर : हिंजवडी, पुनावळे
वेळ : सकाळी ०७.३० वाजता
स्थान : बालाजी विद्यापीठ, ताथवडे

नगर : रावेत
वेळ : सकाळी ०७:०० वाजता
स्थान : इस्कॉन मंदिर रावेत

नगर : आकुर्डी
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : गंगानगर आकुर्डी गावठाण दत्तवाडी