रा.स्व.संघातर्फे आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद यांना अभिवादन

0
304

पिंपरी, दि.१५ (पीसीबी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी चिंचवड जिल्ह्याच्यावतीने आद्य क्रांतीगुरू लहूजी वस्ताद जयंतीनिमित्त चिंचवड स्टेशन येथील त्यांच्या आणि आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके ह्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.अभिवादन प्रसंगी धर्मजागरण विभाग संयोजक माधव खोत, जिल्हा संयोजक संतोष गायकवाड, समरसता विभागाचे महेंद्र बोरकर तसेच अन्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.