राहुल गांधी-नितीन गडकरी यांच्यात चर्चा; सोशल मीडियावर चर्चेचा विषय

0
652

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – देशाच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीतील राजपथावर सैन्यदलाचे संचलन  दिमाखात पार पडले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आमंत्रित करण्यात आलेले प्रमुख पाहुणे सिरील रामाफोसा यांच्यासह राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या उपस्थितीत संचलन पार पडले.

यावेळी उपस्थितांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामध्ये बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या. त्यावरून सोशल मिडीयावर त्यांच्या चर्चेची चांगली चर्चा चांगली आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित राजपथावर सैन्यदलाच्या संचलनाच्या या कार्यक्रमात उपस्थितीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व भाजपचे नेते तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा फोटो व्हायरल झाले आहेत. त्या फोटोत बाजूला भाजपाध्यक्ष अमित शहादेखील दिसत आहेत.त्यामुळे सोशल मिडीयावर सध्या हे दोघे चर्चेचा विषय ठरले आहेत.