राहुल कलाटे यांच्या भूमिकेने सस्पेन्स वाढला

0
200

तासाभरात माघार झाली नाहीच तर तिरंगी लढत अटळ

पिंपरी (दि. १०)- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन उपनेते सचिन अहिर आले होते. उद्धव ठाकरे यांचा अनादर करायचा नाही. पण, माझ्या सोबत असलेल्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक घेईल. समर्थकांशी चर्चा केल्यानंतर अर्ज मागे घ्यायचा की नाही हे ठरवेल आणि निर्णय जाहीर करेन, अशी भूमिका अपक्ष अर्ज दाखल केलेले राहुल कलाटे यांनी घेतली आहे. कलाटे यांच्या या भूमिकेमुळे आणखी सस्पेन्स वाढला आहे. दरम्यान, कलाटे यांना इतके महत्व देण्यामागे नेमके कारण काय याचीच अता चर्चा सुरू असून कलाटे उमेदवार कायम राहिले तर त्याचा आपसूक फायदा भाजपला होईल आणि राष्ट्वादीचे नाना काटे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले जातील याचा अंदाज आल्याने माघारीसाठी जोरदार प्रयत्न आहेत. अवध्या दीड तासात आता चत्र स्पष्ट होणार आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राहुल कलाटे यांनी अपक्ष दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणी झाली. उपनेते सचिन अहिर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी कलाटे यांचा संपर्क करुन दिला. ठाकरे यांच्यासोबत कलाटे यांची 5 ते 7 मिनिटे फोनवर चर्चा झाली.

उद्धव ठाकरे यांचा अनादर करायचा नाही. पण, माझ्या समर्थकांशी चर्चा केल्यानंतर माघारीबाबतचा निर्णय घेणार असल्याचे कलाटे यांनी सांगितले. त्यामुळे नेत्यांच्या मनधरणीला यश येते का, कलाटे माघार घेतात का, हे दुपारी तीननंतर स्पष्ट होईल.

सचिन अहिर यांच्यासोबत शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार आदी पदाधिकारी होते.