राहटणी-श्रीनगर शिवसेना विभागप्रमुखाच्या कारची तोडफोड

0
554

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – राहटणी-श्रीनगर शिवसेना विभागप्रमुख प्रदिप दळवी यांच्या कारची बुधवारी (दि.१०) रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी तोडफोड केली.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीच्या सुमारास राहटणी-श्रीनगर शिवसेना विभागप्रमुख प्रदिप दळवी यांनी त्यांची कार (क्र. एमएच/१४/एफसी/१८३८) ही घराजवळ पार्क केली होती. यावेळी रात्री उशीरा अज्ञात हल्लेखोरांनी दळवी यांच्या कारची तोडफोड करुन नुकसान केले. हे समजताच घटेची माहिती वाकड पोलिसांना कळवण्यात आली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांनपासुन प्रदिप दळवी हे आक्रमक रित्या शिवसेना संघटनेची आक्रमकपणे मांडणी करत होते. याचाच राग मनात ठेवुन हा प्रकार झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध करुन आरोपींना जेरबंध करण्याची मागणी केली आहे.