राष्ट्रवादी काँग्रेस घर फोडणारा पक्ष; पंकजा मुंडेंचा घणाघात

0
1035

बीड, दि. ६ (पीसीबी) –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घरफोड्यांचा पक्ष आहे. आम्ही घर फोडण्याचे काम करत नाही, असा हल्लाबोल राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज (बुधवार) येथे केली.  घर फुटल्यानंतर किती वेदना होतात हे  आम्ही भोगले  आहे, असे त्या म्हणाल्या.

बीडमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित मेळाव्यात  पंकजा मुंडे  बोलत होत्या.

यावेळी पंकजा म्हणाल्या की,  राष्ट्रवादीने क्षीरसागर यांचे घर फोडले. आम्ही कोणाचे घर फोडण्याचे काम केलेले नाही. मात्र जेव्हा क्षीरसागर यांचे घर फोडले , तेव्हा आपल्याला त्रास झाला, असे त्या म्हणाल्या.

घराघरात भांडण लावण्याचे काम त्यांनी नेहमीच केली आहेत. क्षीरसागर यांच्या घरात सुद्धा भांडण लावण्याचे काम त्यांनी केले आहे. सत्तेसाठी हे लोक काहीही  करू शकतात. आम्ही मात्र कोणाचे घर फोडण्याचा काम करणार नाही, असेही त्या म्हणाल्या.