राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा सदस्या फौजिया खान यांना कोरोना

0
220

परभणी, दि. २१ (पीसीबी) : राष्ट्रवादीच्या राज्यसभा सदस्या खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे परभणी जिल्ह्याध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यापाठोपाठ आणखी एका लोकप्रतिनिधीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.फौजिया खान यांच्या अँटीजन टेस्टमध्ये कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी दिली. यापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांचा स्वॅब पॉझिटिव्ह आला होता.63 वर्षीय फौजिया खान या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. मार्च महिन्यातच त्यांची राज्यसभेवर खासदारपदी निवड झाली आहे.

महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात त्यांनी शालेय शिक्षण, महिला आणि बाल कल्याण, राज्यमंत्रीपद भूषवले आहे. फौजिया खान याआधी दोन वेळा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्य राहिल्या आहेत.