सोशल मीडियावर रुपाली ठोंबरेंची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

0
552

पुणे, दि. २९ (पीसीबी) – सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच आता पुण्यातून आणखी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याची सोशल मीडियावर बदनामी करण्यासंदर्भात १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात अपशब्द आणि बदनामी केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

पुण्यातील फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये १६ जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनम गुंजाळ यांनी ही दिली तक्रार दिली आहे. फेसबुक वर ‘१ करोड ताईवर नाराज असणाऱ्याचा ग्रुप’ नावाच्या एका गृपवर शिवीगाळ झाली होती. यासंदर्भात सोशल मीडियावर महिला पदाधिकाऱ्यांची बदनामी केली जात आहे, अशी तक्रार देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर शिवीगाळ आणि अश्लील भाषेत वक्तव्य केली जात होती. त्यामुळे याप्रकरणी सागर गजानन पाटील, प्रसाद राणे, ध्रुवराज ढकेडकर, राजेश दांडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड इतर ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिस अधिकचा तपास करत आहेत.