राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ठार मारण्याची धमकी

0
628

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरुन ठार मारण्याची धमकी दिली आहे. एका खासगी वाहिनीवर कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला धमकी दिल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे.  

अभिनेता नसीरुद्दीन शहा यांच्या  विधानावरील चर्चासत्र एका वाहिनीने घेतले होते. या चर्चासत्रात  नवाब मलिक यांचा सहभाग होता. त्यानंतर त्यांना शुक्रवारी दोन फोन क्रमांकावरुन धमकी देण्यात आली. याबाबत  त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आपल्याबाबत जर बरेवाईट काही झाले तर ते फडणवीस सरकारचीची जबाबदारी असेल, असे  मलिक यांनी ट्विट करत म्हटले आहे.

दरम्यान, याआधी म्हाडा अध्यक्ष आणि शिवसेना आमदार उदय सामंत यांनाही ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दिली आहे.