रावसाहेब दानवेंच्याविरोधात रान उठवा; उध्दव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

0
1122

जालना, दि. १० (पीसीबी) – शेतक ऱ्यांच्या ऊसाला एफआरपीपेक्षा कमी भाव देणारे भाजप  प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध रान उठवा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  येथे दिला. दुष्काळी भागातील शेतक ऱ्यांच्या गुरांना  पशुखाद्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.  

राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दानवे यांचा रामेश्वर सहकारी साखर कारखाना शेतक ऱ्यांना एफआरपीपेक्षा कमी म्हणजे १६०० रुपये टन भाव देत असल्याचे सांगून त्यांच्याविरुद्ध भूमिका घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आशीर्वाद आणि परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांनीही हा मुद्यावरून दानवे यांना आपल्या भाषणात लक्ष्य केले होते.

हाच धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतक ऱ्यांच्या प्रश्नांवरून दानवेंच्या विरोधात रान पेटविणार असाल तर अर्जुनराव तुम्हाला कोणी अडविणार नाही. दानवे शेतक ऱ्यांना ‘रडताहेत साले’, असे म्हणाले होते.  असे सांगून ठाकरे म्हणाले,की दानवे तुमच्यावरही रडण्याची वेळ येईल. तुमच्यावर रडण्याची वेळ आली म्हणजे कळेल. प्रत्येकाची वेळ येते. आता आम्ही हसतो तुम्ही रडा! , अशी टीका उध्दव ठाकरे यांनी केली.