राज ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आपली भूमिका स्पष्ट केली, म्हणतात…

0
463

मुंबई,दि.२१(पीसीबी) – नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. आपल्या देशाला बाहेरून आलेल्या लोकांची काय आवश्यकता आहे असं ते पत्रकार परिषदेत बोलत होते.वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक यंत्रणा निकामी ठरल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही धर्मचा माणूस असेल त्याला बाहेरून आपल्या देशात आणायची काय गरज आहे? असं ते म्हणाले.

आपल्या देशात जे मुस्लिम नागरिक राहतात त्यांना असुरक्षित वाटण्याचं कारण काय? सर्व लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काही धर्मशाळा नाही. अन्य देशातून आलेल्या लोकांना हाकलवून दिलं पाहिजे. माणुसकीचा ठेका हा काही भारतानंच घेतलेला नाही. इकडे राहत असलेल्यांची चिंता मिटत नाही, तर बाहेरून आणखी लोकं का हवी, असा सवालही त्यांनी केला.विनाकारण राजकारण करु नये, भारतातले तरुण तरुणीच बेरोजगार आहेत त्यात बाहेरच्यांना कसं पोसणार? देश म्हणून आपण आणखी ओझं घेऊ शकत नाही. इतर देशातील लोकांना सामावून घ्यायला भारत म्हणजे धर्मशाळा नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

नागरिकत्व कायदा ही देशातील आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्याची खेळी आहे. तसेच हा हिंदू-मुस्लिम वाद नाही, जे बाहेरचे आहेत त्यांना बाहेर काढावं लागेल, बाहेरुन कोणाला येऊ देऊ नये, असं स्पष्ट मत राज ठाकरे यांनी मांडलं आहे.