राजू शेट्टींनी घेतली नारायण राणेंची भेट

0
347

मुंबई, दि. २९ (पीसीबी) –  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीतील तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

राजू शेट्टी यांनी नारायण राणे यांच्या जुहूमधील राहत्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना  उधाण आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, नारायण राणे यांना भाजप प्रणित आघाडीतून राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे. मात्र, शिवसेनेशी त्यांचे असलेले वैर पाहता ते युतीबरोबर जाण्याची तयारी कमी आहे. यामुळेच राणेंना  आघाडीसोबत आणण्याचा राजू शेट्टी प्रयत्न करत असल्याचे या भेटीतून स्पष्ट होत आहे.