रहाटणीत बेकायदेशीर गॅस सिलेंडर रिफील करत असताना स्फोट; दुकानासह आजुबाजूची घर जळून खाक

0
559

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – बेकायदेशीरपणे घरगुती वापरातील तसेच व्यावसायासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडर मधील गॅस छोट्या ५ किलोच्या सिलेंडरमध्ये भरत असताना दोन सिलेंटरचा स्फोट होऊन आग लागली. या आगीत गॅस सिलेंडरच्या दुकानास आजुबाजूची काही घर जळुन खाक झाली. ही घटना मंगळवार (दि. ९) सायंकाळी ७ च्या सुमारास वाकड म्हातोबानगर येथील श्री. बालाजी गॅस एन्टरप्राईजेस या दुकानात घडली.

सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जिवीत हाणी झाली नाही. मात्र बेकायदेशीरपणे गॅस रिफील करणाऱ्या या व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी म्हातोबानगर येथील श्री बालाजी गॅस एन्टरप्राईजेस या दुकानात काही कामगार बेकायदेशीरपणे एका गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरत होते. यावेळी एका सिलेंडरचा स्फोट झाला यावर कामगारांनी तातडीने बाहेर पळ काढला इतक्यात आणखी एका सिलेंडरचा स्फोट झाला आणि दुकानासह आजूबाजूच्या घरांना आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आणि काही वेळातच आग आटोक्यात आणून पाच सिलेंडरचा स्फोट होण्याअगोदरच बाहेर काढले. याप्रकरणी दुकानाचे मालक किरण अशोक डावरगावे (२३) यांच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरिक्षक मडके अधिक तपास करत आहेत.