“ये भोगी, शिक आमच्या योगी कडून…`अमृता फडणवीस यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरीत टीका..

0
292

मुंबई,दि. २८ (पीसीबी) : महाराष्ट्रात भोंग्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबाबत एक बैठक बोलवली होती. त्याला भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे अनुपस्थित राहिले होते. मशिदींवरील भोंगे उतवरण्यासाठी ३ मे ही शेवटची तारीख ठाकरे यांनी राज्य सरकारला दिली आहे. भोंग्यांवरुन अमृता फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट करुन टीका केली आहे. ये भोगी, काही तरी शिक आमच्या ‘योगीं’कडून !, असा अमृता यांनी ठाकरे यांना सल्ला दिला आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मशिदींवरील भोंगे उतरवले आहेत. त्याचा संदर्भ घेत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना योगींकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांचे अभिनंदन केले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. राज ठाकरे म्हणतात, उत्तर प्रदेशातील धार्मिकस्थळांवरील, विशेषतः मशिदींवरील भोंगे उतवरल्याबद्दल योगी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!, असा टोला राज यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लगावला आहे. महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना, असे राज म्हणाले.

दोनच दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदीत ट्विट करुन टीका केली आहे. त्या म्हणतात कलियुगच्या या राजाने आता एक नवीन आदेश काढले आहे, जो उगळेल ‘च’ ची शिवी, त्याला इज्जत आणि मान आहे. जो जप करेल प्रभूचा, उसकी हलक में जान है ! अशी कोटी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.