‘या’ चित्रपट निर्मात्याला करायचंय रियासोबत काम; ट्विट करत म्हणाला,”कदाचित तू खरंच तितकी वाईट… “

0
476

मुंबई, दि.०९(पीसीबी) : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआय कडे दिल्यानंतर १५-२०च दिवसात सीबीआयने मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्स घेतल्याच्या आरोपाखाली आणि आणखी आरोपांखाली पुराव्यासह मंगळवारी अटक केली. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रियाला पाठिंबा दर्शवला. यामध्ये चित्रपट निर्माता निखील द्विवेदी याने रियासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

 

विशेष म्हणजे सध्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी खूप दिवसांनंतर रियाला पाठिंबा दिला आहे. मात्र ,निखीलचं हे ट्विट पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. “रिया, मी तुला ओळखत नाही. मला नाही माहित एक व्यक्ती म्हणून तू नेमकी कशी आहेस. कदाचित तू खरंच तितकी वाईट असशील जितकं तुला दाखवण्यात येत आहे. कदाचित तशी नसशील सुद्धा. पण मला एक समजतंय की तुझ्यासोबत जे घडतंय ते अत्यंत चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे. एक सुसंस्कृत देश असं करेल असं नाही हे. पण जेव्हा हे सगळं प्रकरण संपेल तेव्हा नक्कीच मला तुझ्यासोबत काम करायला आवडेल”, असं ट्विट निखीलने केलं आहे. निखील द्विवेदीने ट्विट करत रियासोबत काम करायची इच्छा व्यक्त केली आहे.