“…यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही, याची ग्वाही सरकार देणार का?” संजय राऊतांचा मोदी सरकारला प्रश्न

0
200

मुंबई,दि.२०(पीसीबी) : केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विधेयक मांडल्यानंतर विधेयकावर चर्चा करताना विरोधी पक्ष आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसून आले. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही विधेयकावरून सरकारला सवाल केलाय. मोदी सरकारनं कृषि क्षेत्राशी संबंधित असलेली दोन विधेयकं लोकसभेतील मंजुरीनंतर आज राज्यसभेत मांडली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या राजीनाम्यावरूनही राऊत यांनी मोदींना टोला लगावला.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य, शेतकरी दर हमी ही दोन विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी राज्यसभेत मांडली. या विधेयकांवर चर्चा करताना विरोधी पक्षांच्या खासदारांनी भूमिका मांडली. संजय राऊत प्रशकर्त म्हणाले कि, ”देशातील ७० टक्के लोक शेतीशी जोडले गेलेले आहेत. संपूर्ण लॉकडाउनच्या काळात शेतकरी काम करत होता. ही विधेयके मंजुर झाल्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार का?, त्यानंतर यापुढे देशात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही,” याची ग्वाही सरकार देणार का?,” ”या विधेयकांना शेतकऱ्यांचा विरोध आहे. तर पूर्ण देशात याला विरोध का होत नाहीये? जर देशभरात विरोध होत नाहीये म्हणजे याचा अर्थ असा होतो की, विधेयकासंदर्भात काही गैरसमजही आहेत. सरकारनं हे गैरसमज दूर करायला हवेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, विधेयकाबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे मला विचारायचं की, अफवेमुळेच एका मंत्र्यानं राजीनामा दिला का?,” असा सवाल राऊत यांनी मोदी सरकारला केला.

तर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी विधेयक मांडताना सांगितलं कि,“हे दोन्ही कायदे ऐतिहासिक असून, शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणतील. शेतकरी त्यांचा शेतमाल देशभरात कुठेही मुक्तपणे विकू शकतील. मी शेतकऱ्यांना आश्वासित करतो की ही विधेयके एमएसपीशी संबधित नाहीत,”