याच वेगानं संसर्ग होत राहिला तर १० ॲागस्टपर्यंत देशात २० लाख लोक कोरोनाबाधित असतील – राहुल गांधी

0
368

नवी दिल्ली,दि.१७(पीसीबी) – १०,००,००० चा आकडा आपण पार केला आहे. याच वेगानं संसर्ग होत राहिला तर १० ॲागस्टपर्यंत देशात २० लाख लोक कोरोनाबाधित असतील असं मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं आहे.

१४ जुलैला राहुल गांधी यांनी ट्विट करत आठवड्यानंतर देशातील कोरोनाची आकडेवारी १० लाखांचा टप्पा पार करेल, असं विधान केलं होतं. याप्रमाणे भारतातील कोरोना बाधितांचा आकडाही झपाट्यानं १० लाखांच्या पार पोहचला आहे.

दरम्यान, कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी सरकारनं आता ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, असा सल्लाही आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला आहे.