म्हणून नाकारली बैलगाडा शर्यतीला परवानगी- दिलीप वळसे पाटील..

0
272

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पुण्यातील बैलगाडा शर्यतीला दिलेली परवानगी अचानक जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली. पण वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला गेला, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. परिस्थिती नियंत्रणात आली की परवानगी दिली जाईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. त्याचबरोबर अनधिकृतपणे शर्यतीचे आयोजन करु नये सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण निकाल अजून यायचा आहे, ही अंतरिम परवानगी आहे असे आवाहनगही वळसे पाटलांनी केले आहे.

Bulli Bai App वरुन मुस्लीम महिलांविरोधात द्वेष पसरवल्यामुळे देशातील वातावरण तापले आहे. याबाबत माहिती देताना वळसे पाटील म्हणाले ”सायबर पोलीस स्टेशन, CID मुंबई येथे गुन्हा दखल करण्यात आला आहे. एका विशिष्ट समाजातील महिलांना अशा प्रकारे टार्गेट करणे दुर्दैवी तपास करुन पुढील कारवाई तातडीने केली जाईल”. त्याचबरोबर हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटील यांच्या लग्नात अनेक नेत्यांची उपस्थीती होती. त्यानंतर अनेक नेत्यांची कोरोना चाचणी कोरोना पॉझिटीव्ह आली होती. नियम सर्वांनीच पाळायला हवेत, नेत्यांच्या मुला-मुलींची लग्न असतील तरी त्याला वेगळी ट्रीटमेंट दिली जाणार नाही असे वळसे पाटील म्हणाले.