‘…म्हणून त्याने पेटवली दुचाकी’

0
324

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञातांनी रात्रीच्या वेळी पेटवून दिली. ही घटना गुरुवारी (दि. 19) मध्यरात्री साडेबारा वाजता पंडित चाळ, देहूरोड येथे घडली.

मोनिष राजू पातोडे (वय 22, रा. पंडितचाळ, देहूरोड) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पात्रोडे यांनी त्यांची 80 हजार रुपये किमतीची दुचाकी गुरुवारी रात्री घरासमोर पार्क केली होती. मध्यरात्री साडेबारा वाजता अज्ञातांनी पात्रोडे यांचे आर्थिक नुकसान करण्याच्या उद्देशाने त्यांची दुचाकी पेटवून दिली. यामध्ये दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.