…. म्हणून चक्क पोलिसांनी जप्त केले दोन क्विंटल जिलेबी आणि हजारो सामोसे

0
252

उत्तर प्रदेश, दि. ११ (पीसीबी) : पोलिसांनी दोन क्विंटल जिलेबी आणि १०५० सामोसे का जप्त केले असतील, असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. हे सगळं जप्त करण्यामागच कारण आहे निवडणूक! हो… निवडणूकच. आणि ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दहा जणांना अटकही केलं आहे.

महाराष्ट्रात नाही, तर देशभरात सध्या करोनाचा उद्रेक झालेला आहे. उत्तर प्रदेशातही करोना वाढत असल्याचं समोर आलेल्या आकडेवारी दिसत आहे. तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही राज्यात होत आहे. तर जिलेबी आणि सामोसे जप्त करण्याला या दोन्ही गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत.
हसनगंज ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवारांने मतदारांना वाटप करण्यासाठी जिलेबी आणि सामोसे यांचा बेत आखला होता. तशी तयारीही करण्यात आली. आजारी आले, कामाला लागले. जिलेबी आणि सामोसे तयार करण्याचं काम सुरू असतानाच उन्नाव पोलिसांनी घटनास्थळी पाऊल ठेवलं.

सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी मतदारांना वाटण्यासाठी तयार करण्यात आलेली २ क्विंटल जिलेबी आणि १०५० सामोसे जप्त केले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हाही दाखल केला. कोविड नियमावलीचा आणि निवडणूक आचारसंहिता भंगाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला असून, याप्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनीच याची माहिती दिली.