म्हणून कोरोनाचे २० कोटी डोस नष्ट करणार

0
200

पुणे, दि. २४ (पीसीबी) – कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्ड बऱ्याच जणांनी घेतली आहे. याच लसीच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या लसीचे जवळपास २० कोटी डोस नष्ट करण्यात येणार आहेत. सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे.गरजेपेक्षा अधिक पुरवठा झाल्याने हे डोस नष्ट करण्याची वेळ सिरम इन्स्टिट्युटवर आली आहे. सप्टेंबरपर्यंत कोविशिल्डचे २० कोटी डोस नष्ट करण्यात येणार आहे. अदर पुनावाला सध्या स्वित्झर्लंडमध्ये आहेत. तिथल्या माध्यमांशी बोलताना अदर पुनावाला म्हणाले की, बाजारात जेवढी गरज होती, त्यापेक्षा अधिक प्रमाणात पुरवठा झाला आहे. काही डोस ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये एक्सपायर होणार आहेत. त्यामुळे हे डोस नष्ट करावे लागत आहेत.

कोरोनाचा कहर सुरू होता, त्यावेळी या लसींची प्रचंड मागणी होती. जगभरात या लसी पुरवल्या जात होत्या. मोठ्या संख्येने लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. आता बुस्टर डोसही उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र या बुस्टर डोसला अपेक्षित तितका प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे हे उत्पादनाचं गणित चुकलं. हे डोस ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत दिले गेले नाहीत, तर ते एक्स्पायर होतील. आणि त्यानंतर ते टाकून द्यावे लागणार आहेत.