मोशी येथील शिवयोद्धा SY ग्रुप च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

0
588

पिंपरी,दि.२१(पीसीबी) – देशावर आलेल्या महामारी चे संकट बघता कोरोना च्या पार्श्वभूमीवर मोशी येथील शिवयोद्धा SY ग्रुप च्या वतीने सोशल डिस्टन्स ठेऊन गर्दी न करता स्वइच्छेने आज दि.20 एप्रिल सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत भव्य असे रक्तदान शिबिर भरवण्यात आले.

रक्तदान करणाऱ्या 56 युवकांची नोंद करत रक्तदान शिबिर पार पाडण्यात आले.

दरम्यान आयोजक अध्यक्ष गणेशशेट निवृत्ती सस्ते, युवानेते केदारशेट गव्हाणे,आशिष शहा,तुषार हवालदार आणि शिवयोद्धा SY ग्रुप कार्यकर्ते आदी उपस्थित होते.