मोशीतील ‘रिव्हर प्लोगेथॉन’ मोहिमेत 3 टन कचरा संकलित

0
345

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्लास्टिक मुक्ती अभियाना अंतर्गत क क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रातील चिखली व मोशी येथील इंद्रायणी नदीच्या परिसरात आयोजित “रिव्हर प्लोगेथॉन” मोहिम मध्ये सुमारे चारशे पन्नास शालेय विद्यार्थी,शिक्षक,सोसायटी फेडरेशन चे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग घेऊन सुमारे 3 टन कचरा संकलित केला.

चिखली येथील भैरवनाथ मंदिर परिसर लगत असणाऱ्या इंद्रायणी नदीच्या किनारा व परिसरात प्लास्टिक मुक्ती अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.तसेच प्लास्टिक वापरणार नसल्याबाबत व पर्यावरण संवर्धनासाठी शपथ घेतली. तसेच मोशी येथील रिव्हर रेसिडेन्सी सोसायटी लगत असणाऱ्या नदी किनारच्या परिसरातही प्लोगेथोन मोहीम राबविण्यात आली.

यांमध्ये माजी महापौर राहुल जाधव, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,चिखली सोसायटी फेडरेशन चे अध्यक्ष संजीवन सांगडे, दिनेश यादव, गणेश मोरे ,बी बी कांबळे,वैभव कांचनगौडार, एस एन बी पी शाळेचे सुमारे 300 विद्यार्थी, सिटी प्राइड शाळेचे सुमारे 25 शिक्षक , श्रीमती भाल्ला , सूजा राजेश व मोशी परिसरातील विविध सोसायटी चे सभासद,ज्येष्ठ नागरिक , महापालिका अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.
तसेच नागरिकांमध्ये प्लास्टिक मुक्त अभियानाची जनजागृती करणेकामी सुमारे 300 शालेय विद्यार्थी सोबत रॅली काढण्यात आली.