मोरवाडीत टोळक्यांकडून तरुणावर ब्लेडने वार

0
1592

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – उद्यानात वॉकिंगला गेलेल्या तरुणाला चौघा जणांच्या टोळक्यांनी जबर मारहाण करुन कपाळावर आणि हातावर ब्लेडने वार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.२७) रात्री साडेआठच्या सुमारास मोरवाडी येथील श्रीमती यमुनाबाई मारुती वाघेरे पाटील उद्यानात घडली.

किरण महेंद्र मोरे (वय १९, रा. मोराई मंदीराशेजारी लालटोपीनगर, मोरवाडी) असे ब्लेडने वार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने पिंपरी पोलीसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार कुंदन उमेश गायकवाड (वय १९), दादा अशोक कांबळे (वय २६), केशव सतीश पवार (वय १६) आणि अक्षय फुले (वय २५, सर्व रा. लालटोपीनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी किरण हा मोरवाडी येथील श्रीमती यमुनाबाई मारुती वाघेरे पाटील उद्यानात वॉकिंगसाठी गेला होता. यावेळी चौघा आरोपींनी किरण याला, काय रे तु आमच्या चुगल्या लावतोस, असे बोलून लाथा बुक्कयांनी जबर मारहाण करायला सुरुवात केली. तसेच कुंदन याने त्याच्या हातातील ब्लेडने किरण याच्या कपाळावर आणि हातावर वार करुन पसार झाले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे तपास करत आहेत.