मोदी सरकार लोकशाहिचा खून करतंय – नाना पटोले

0
122

नागपूर, दि. २० (पीसीबी) : वेलमध्येही न उतरता जागेवर उभे राहून प्रश्न विचारणाऱ्या १४१ खासदारांना निलंबित करणारे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकशाहीचा खून करत आहे, असा आरोप करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली. विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, एकतर्फी निर्णय घेऊन केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करीत आहे. अशा रितीने देशाच्या इतिहासात प्रश्न विचारणाऱ्या खासदारांना कधीही निलंबित करण्यात आलेले नाही. ही लोकशाहीची नुसती थट्टा नसून तिचा खून केल्यासारखे आहे.

महाराष्ट्रच नव्हे तर देशातील अनेक विधानसभांमध्ये याचे पडसाद उमटले आहेत. राज्यातही याहून वेगळे चित्र नाही. विरोधकांचा आवाज दाबण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केंद्र आणि भाजापा सरकार करीत आहे. विरोधकांनी कोणताही प्रश्न उपस्थित केला तर त्यांना विधानभवन आणि परिषदेत आपले म्हणणे देखील मांडू दिले जात नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या या कृतीचा आणि निषेध करतो, असेही पटोले यांनी सांगितले.