मोदी सरकार जाईपर्यंत कपडे घालणार नाही; अर्धनग्न तरूणाचे शरद पवारांना भरसभेत निवेदन

0
756

नाशिक , दि. २४ (पीसीबी) – भाजप सरकार राज्यातून आणि केंद्रातून जात नाही, तोपर्यंत आपण कपडे घालणार नाही, असा निर्धार एका  तरुणाने केला आहे.  याबाबतचे निवेदन या तरूणाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिक जिल्ह्यातील निफाडमधील जाहीर  सभेत दिले.  या सभेदरम्यान  हा तरुण चक्क अर्धनग्न अवस्थेत  निवेदन देण्यासाठी स्टेजवर आला.

कृष्णा डोंगरे असे या आंदोलक तरुणाचे नाव आहे. कृष्णा  मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी  गेल्या दोन महिन्यांपासून अर्धनग्न अवस्थेत फिरत आहे. आज कृष्णाने शरद पवारांना भेटून आपले  निवेदन त्यांना दिले. शरद पवारांनीही  कृष्णाचे निवेदन स्वीकारत काळजी करु नको, असे कृष्णाला आश्वस्त केले.

कृष्णाने  जमिनीच्या प्रश्नावरुन काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. परंतु सरकारने दडपशाही केल्याचा आरोप त्याने केला आहे. त्यानंतर मार्च महिन्यात कृष्णाने आपले कपडे आणि चप्पल पंतप्रधान कार्यालयाला स्पीड पोस्टने पाठवली आहेत.