मोदी सरकारच्या काळात दलित अत्याचाराच्या घटनांत वाढ

0
452

नवी दिल्ली , दि. २४ (पीसीबी) – संसदेत देशाच्या अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे. विविध मुद्द्यांवरून भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद होत आहेत. अशातच दलित अत्याचाराच्या घटनांच्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवलेंनी धक्कादायक माहिती दिली आहे.

2018-2020 या तीन वर्षांच्या काळात देशात दलितांवरील अत्याचारासंदर्भात तब्बल 1 लाख 38 हजार 825 गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. बसपाचे खासदार हाजी फजलूर रहमान यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता.
भाजपशासित उत्तर प्रदेशात सर्वाधिक दलित अत्याचाराच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. 2020 मध्ये तब्बल 12 हजार 714 तर एकून तीन वर्षात 36 हजार 467 अशी भयानक आकडेवारी समोर आली आहे. उत्तर प्रदेशपाठोपाठ बिहार, राजस्थान आणि मध्यप्रदेशचा क्रमांक लागतो.

दरम्यान, दलितांवरील अन्यायाच्या प्रकरणासंदर्भात महाराष्ट्राची आकडेवारी इतर राज्यांच्या तुलनेत चांगली आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी संसदेत सर्व माहिती दिली आहे.