मोदी आणि भाजपला हद्दपार करा, नाहीतर पुन्हा भीमा कोरेगाव घडेल – सक्षणा सलगर

0
676

उस्मानाबाद, दि. ४ (पीसीबी) –  भाजप सरकारच्या काळात भीमा कोरेगाव घडले, असा आरोप करून पंतप्रधान मोदी आणि भाजपला हद्दपार केले नाही, तर पुन्हा एकदा भीमा कोरेगाव घडेल, असे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या  अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी म्हटले आहे. दलितांना जगण्याचा अधिकार नाही का ?, असा  सवालही त्यांनी यावेळी केला.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी उमरगा येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या.  यावेळी सलगर यांनी   मोदी आणि भाजप सरकारवर  जोरदार हल्लाबोल केला.

१९९३ साली मराठवाडा नामविस्तारावेळी शिवसेनेने  काय घोषणा केली होती, हे आठवून पहावे.  त्यावेळी शरद पवारसाहेबांना सहकाऱ्यांनी सत्ता जाण्याची भीती व्यक्त केली होती, मात्र महामानवाचे काम जगात उल्लेखनीय आहे. त्यामुळे नाव दिलेच पाहिजे, असे पवारांनी त्यांना  सांगितले.