मोदींसारखा मेकअप् करत नाही, म्हणून आमची भाषणे टीव्हीवर दाखवत नाहीत – एच.डी. कुमारस्वामी

0
436

बंगळुरू, दि. ९ (पीसीबी) – आम्ही मेकअप करत नाही, म्हणून आमचा चेहरा पंतप्रधान  मोदी यांच्यासारखा आकर्षक नाही, त्यामुळे प्रसारमाध्यमांकडून टेलिव्हिजनवर आमची भाषणे दाखवली जात नाहीत, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. 

कुमारस्वामी आज (मंगळवारी) एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी  ते म्हणाले की, मोदी दररोज उठल्यानंतर मेकअप करून चेहरा उजळवतात.  त्यानंतर ते कॅमेऱ्यासमोर बसतात. मात्र, आम्ही सकाळी एकदा आंघोळ केल्यानंतर थेट दुसऱ्या दिवशी चेहरा धुतो. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर आमचा चेहरा फारसा चांगला दिसत नाही. त्यामुळेच प्रसारमाध्यमांकडून टीव्हीवर फक्त मोदींचीच भाषणे दाखवली जातात, असे  कुमारस्वामी म्हणाले.

दरम्यान,  पंतप्रधान मोदी यांची चित्रदुर्ग येथे जाहीर सभा झाली होती. या सभेत त्यांनी  काँग्रेस आणि जेडीएस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. हे दोन्ही पक्ष स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार चालवत आहेत.  त्याचे परिणाम  सर्वत्र दिसून येत आहेत, असे मोदी यांनी  म्हटले होते.