मोदींवर ७२ वर्षांसाठी बंदी घाला- अखिलेश यादव

0
608

लखनौ, दि. ३० (पीसीबी) – पश्चिम बंगालमधील  मोदींनी केलेले भाषण अत्यंत लाजिरवाणे आहे. मोदी यांच्यावर ७२ तासांसाठी नव्हे, तर ७२ वर्षांसाठी बंदी घालण्यात यावी,  अशी मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी  ट्‌विट करून केली आहे.  

पश्चिम बंगाल मध्ये प्रचारसभेत बोलताना मोदी यांनी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. यावर अखिलेश यादव यांनी मोदींवर  पलटवार केला आहे.

यादव आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, विकास विचारत आहे . तुम्ही पंतप्रधानांचे लाजिरवाणं भाषण ऐकलंत का ? १२५ कोटी भारतीयांचा विश्वास गमावल्यानंतर आता ४० आमदार संपर्कात आहेत,  अशा खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत.  यातून  मोदींची पैशांची मानसिकता दिसत आहे.