मोदींनी चहा विकलेल्या स्टेशनबद्दल गुजरात सरकारने घेतला मोठा निर्णय  

0
457

अहमदाबाद, दि. ३ (पीसीबी) – पंतप्रधान मोदी यांचा चहा विक्रेता ते देशाचा पंतप्रधान असा थक्का करणारा प्रवास आहे. वडनगर स्टेशनवर मोदी यांनी लहानपणी चहा विकला होता. आता हे स्टेशन पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे.

वडनगर स्टेशनला टुरिस्ट स्पॉट बनवण्यात येणार आहे. या माध्यमातून या स्टेशनचा कायापालट करण्यात येणार आहे. अधिकाधिक पर्यटक या ठिकाणी येण्यासाठी हे स्टेशन मॉडेल स्टेशन बनविण्यात आले आहे.

मोदी यांनी चहा विकलेल्या स्टॉलमध्ये कुठलाही बदल करण्यात येण्यात नाही. चहाचा हा ठेला जसाच्या तसा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  गुजरात सरकारमधील पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी या स्टेशनचा दौरा केला. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी लहानपणी मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर रेल्वे स्टेशनवर चहा विकला होता. याचा उल्लेख त्यांनी आजपर्यंतच्या आपल्या अनेक भाषणांमध्ये केला आहे.

दरम्यान, मोदी यांनी चहा विकलेल्या या स्टेशनबाबत वाद आहे. मोदींनी लहानपणी चहा विकल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप  विरोधकांनी केला आहे.