मोदींच्या सभेतील बंदोबस्तासाठी गेलेल्या पुणे पोलिसांच्या बसला अपघात; ११ पोलीस जखमी; ५ जण गंभीर

0
523

गोंदिया, दि. ४ (पीसीबी) – गोंदिया येथील नरेंद्र मोदी यांची सभा आटोपून परतणाऱ्या पुणे पोलिसांच्या बसला बुधवारी (दि.३) रात्री भीषण अपघात झाला. गोंदिया-आमगाव मार्गावर ठाणा गावाजवळील गोरेगाव मार्ग वळण रस्त्यावर हा अपघात झाला.या अपघातात ११ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यातील ५ जण गंभीर आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी गोंदियात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती. या ठिकाणी बंदोबस्तासाठी पुण्यातील पोलिसांचे एक पथकही गेले होते.  सभा संपल्यानंतर पोलीस कर्मचारी पुण्यात परतत होते. रात्री १० च्या सुमारास गोंदिया-आमगाव मार्गावर ठाणा गावाजवळ बस उलटली. या अपघातात ११ पोलीस कर्मचारी जखमी झाले. अपघातात पोलीस शिपाई भरत धोंडीराम मालवदे, एएसआय चुन्नीलाल राठोड, अमित जगताप, डी. डी. डांगे, राहुल लोंढे, विशाल कांबळे, समर बनसोडे, एम.जे.कोळी, सत्यवान कांबळे, रवि नेवाले आणि विशाल कांबळे यांचा समावेश आहे. जखमीपैकी ४ ते ५ पोलीस गंभीर असल्याने त्यांना डॉ. बजाज यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.